-राजापूर कुणबी पतपेढीची एक जागा बिनविरोध

-राजापूर कुणबी पतपेढीची एक जागा बिनविरोध

Published on

३८ ( पान ३ साठी)

़''कुणबी पतपेढी’ची एक जागा बिनविरोध

२४ उमेदवार रिंगणात ; १२ जागांसाठी २५ ला मतदान

राजापूर, ता. १६ ः राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या २०२२-२३ ते २०२७-२८ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १३ पैकी एक जागा बिनविरोध झाली. उर्वरित १२ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी २५ जूनला मतदान होणार आहे.

या पतसंस्थेच्या अनुसूचित जाती/जमाती राखीव मतदार संघातून रवींद्र पवार व अनंत मोरवस्कर हे निवडणूक रिंगणात आहेत. भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून दशरथ कविस्कर व धनेश कोकरे निवडणूक रिंगणात आहेत. इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून दीपक बेंदे व प्रकाश लोळगे तर महिलांसाठी राखीव मतदार संघातून दोन जागांसाठी वैष्णवी कुळये, मानसी दिवटे, उन्नती वाघरे, अमृता शिवगण रिंगणात आहेत. सर्वसाधारण गट मतदार संघातून सुरेश ऐनारकर, विद्याधर गोठणकर, काशिनाथ गोर्ले, चंद्रकांत जानस्कर, सोनू तिर्लोटकर, बाळकृष्ण तांबे, संतोष तांबे, अविनाश नवाळे, सुभाष नवाळे, हनुमंत पाष्टे, वासुदेव मासये, प्रकाश मांडवकर, शांताराम शेडेकर, रमेश सूद हे निवडणूक रिंगणात आहेत.
या पतपेढीच्या एकूण १३ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पैकी तालुक्याबाहेरील शाखांसाठी सर्वसाधारण गटातून स्वप्नील खटावकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील शाखांसाठी सर्वसाधारण गटातून ७ जागांसाठी तब्बल २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पैकी १४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता १४ उमेदवार रिंगणात आहेत. महिला राखीव गटातून दाखल ५ पैकी एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. इतर मागास राखीव प्रवर्ग राखीव मतदारसंघातून २ जागांसाठी ७ अर्ज दाखल झाले होते. पैकी ३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १२ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात असून दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी २५ जूनला मतदान होणार असून २६ जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुधीर कांबळे काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com