दुग्धोत्पादनास ''गोकुळ''चे पूर्ण सहकार्य

दुग्धोत्पादनास ''गोकुळ''चे पूर्ण सहकार्य

Published on

09821
सिंधुदुर्गनगरी : ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा सत्कार करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. शेजारी उपाध्यक्ष अतुल काळसेकर.

दुग्धोत्पादनास ‘गोकुळ’चे पूर्ण
सहकार्य ः अरुण डोंगळे

सिंधुदुर्गनगरीत दुग्ध विकास आढावा सभा

ओरोस, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी चांगला प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना ‘गोकुळ’ नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी जिल्हा बँक, गोकुळ, भगीरथ प्रतिष्ठान आयोजित दुग्ध विकास आढावा समिती सभेमध्ये दिली.
जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी यांची दुग्ध विकास आढावा समिती सभा सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आली. या सभेस कोल्हापूर जिल्हा दूध संघचे (गोकुळ) अध्यक्ष अरुणराव डोंगळे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, समीर सावंत, नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे, दुग्ध विकास अधिकारी कृष्णा धुळप, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग अधिकारी विद्यानंद देसाई, ‘गोकुळ’चे अधिकारी योगेश गोडबोले, नितीन रेडकर, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, भगिरथ प्रतिष्ठान झारापचे डॉ. प्रसाद देवधर, प्रभाकर सावंत, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.
श्री.डोंगळे यांनी अध्यक्ष झाल्यावर प्रथमच जिल्हा बँक प्रधान कार्यालयास भेट दिली. त्यांचे स्वागत जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी केले. यावेळी डोंगळे व उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com