शिक्षण सहकार पॅनेलची बाजी

शिक्षण सहकार पॅनेलची बाजी

Published on

09839
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनलचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते.

शिक्षण सहकार पॅनेलची बाजी

माध्यमिक पतपेढी निवडणूक; ‘आदर्श सहकार’ला अवघ्या चार जागा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेलने एकतर्फी बाजी मारीत ११ जागांवर विजय मिळविला. तर आदर्श सहकार पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले; मात्र शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल आणि विद्या सहकार परिवर्तन पॅनेल या सहकार पॅनेलचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा मिळाली नाही.
पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल (ता. १५) ९७.९७ टक्के एवढे चुरशीचे मतदान झाले. १५ संचालकपदांसाठी ६२ उमेदवारांनी निवडणूक लढविली. आज सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील संस्थेच्या पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरू झाली. दुपारी दीड वाजता मतमोजणी संपली. ही निवडणूक अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श सहकार पॅनेल, संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनेल, दिनेश म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल, गजानन नानचे यांच्या नेतृत्वाखाली विद्या सहकार परिवर्तन पॅनेल अशा एकूण चार पॅनेलच्या माध्यमातून लढविली गेली. या व्यतिरिक्त चार अपक्ष उमेदवार रिंगणात होते. यातील तालुका मतदार संघातील आठ पैकी पाच मंदार संघात सर्वसमावेशक, तर तीन मतदारसंघात आदर्श पॅनेलने विजय मिळविला. जिल्हा मतदार संघातील सात पैकी सहा मतदारसंघांवर सर्वसमावेशक पॅनेलने तसेच एका मतदार संघावर आदर्श पॅनेलने विजय मिळविला.
तालुका मतदारसंघातील दोडामार्गमध्ये महेंद्र देसाई १५, शरद देसाई ५२ (विजयी), अर्जुन राणे १४, शाबी तुळसकर ३०, सावंतवाडी मतदारसंघात लाडू जाधव २३, शिवराम मोरस्कर ५०, संदीप सावंत १४० (विजयी), प्रशांत सावंत ८१, यादव ठाकरे ७, कुडाळ मतदार संघ- गोपाळ हरमलकर ८०, रमाकांत नाईक ८३ (विजयी), संतप्रसाद परब १५. वेंगुर्ले मतदारसंघ- सुरेंद्र चव्हाण ४३, सुनील जाधव ११, संदीप काळे ४९, आशिष शिरोडकर ६२ (विजयी), मालवण मतदारसंघ- संगम चव्हाण २२, सुमित मसूरकर १४० (विजयी), संजय तेंडुलकर ४७, प्रदीप सावंत ५३, जयवंत ठाकूर १०, कणकवली मतदारसंघ- बयाजी पुराण ६७, शरद चोडणकर ६४, संतोष जोईल ८३, मारुती पुजारी ८९ (विजयी), वैभववाडी मतदारसंघ- शरद कांबळे ४, प्रतिभा कोकरे ४२, जयवंत पाटील ४९ (विजयी). देवगड मतदारसंघ- पंढरीनाथ आचरेकर ३७, अजित कदम ३९, दत्ताराम कोकरे ८७, सत्यपाल लाडगावकर ११३ (विजयी) अशाप्रकारे तालुकानिहाय उमेदवारांना मते मिळाली.
जिल्हा सर्वसाधारण मतदारसंघातून दोन संचालक निवडून द्यायचे होते. यामध्ये दिनेश म्हाडगुत २५४, रुपेश नियोगी ८३, समीर परब ६७२ (विजयी), स्वप्नील पाटील ६०७ (विजयी), अनिल राणे, ३१९ एकनाथ राऊळ १३७, शिवराम सावंत ४६६, संदीप शिंदे ४१९, किशोर सोन्सूरकर १८०. दोन महिला प्रतिनिधी संचालक निवडून द्यायचे होते. यासाठी अश्विनी गर्जे ५६२, धनश्री गावडे २३७, संगीता गावडे १६६ स्वप्निली घावरे ४२२, सुमेधा नाईक ६९० (विजयी), सुषमा परब १४९, विद्या शिरसाट ६३४ (विजयी), सुविधा तावडे २६५. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून एक संचालक निवडून द्यायचा होता. यासाठी आनंदा बामनोकर १७९, सुनील जाधव ६५९, संदीप कदम ६६१ (विजयी) संदीप सावंत २०६. इतर मागास प्रवर्गच्या एका जागेसाठी सूर्यकांत चव्हाण २७१, विष्णू काणेकर १२२, नारायण साळवी ११२, अजय शिंदे ४३८, संजय वेतुरेकर ७४५ (विजयी). भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग यामधून एक संचालक निवडून द्यायचा होता. यासाठी महादेव चौगुले १४९, कमलेश गोसावी ३२६, पांडुरंग काळे ५९२, सुरेंद्र लांबोरे ६३३ (विजयी) अशाप्रकारे जिल्हा मतदार संघातील सात संचालक पदासाठी उमेदवारांना मते मिळाली आहेत.
..............
चौकट
तीन पॅनेलच्या प्रमुखांचा पराभव
चार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली गेली. यातील अजय शिंदे, दिनेश चव्हाण आणि गजानन नानचे या तीन पॅनेल प्रमुखांचा पराभव झाला. याशिवाय अपक्ष राहिलेल्या चारही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला यादव यांनी काम पाहिले. त्यांना श्रीकृष्ण मयेकर, नंदिनी सामंत, श्रीमती एस. ए. ढवण, विक्रांत आरेकर, श्रीमती पी. यू. पई, एम. एस. धुमाळ, आर. टी. चौगुले, पी. पी. साळगावकर, ए. एल. हिर्लेकर, पी. आर. आरावंदेकर, शिवप्रसाद चौकेकर, पी. एल. जाधव, एन. एस. वजराटकर, प्रमोद कांबळी, राधिका हळदणकर, नम्रता माळकर, रुपेश मोरे, अतुल मालंडकर, सान्वी शेट्ये, विलास सावंत यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com