पाईपलाईन खोदाईने अपघातांस निमंत्रण

पाईपलाईन खोदाईने अपघातांस निमंत्रण

Published on

09835
सावंतवाडी ः येथे निवेदन देताना रत्नाकर आगलावे. सोबत हेमंत दाभोलकर, गुरुदास गवंडे व इतर.
(छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

पाईपलाईन खोदाईने अपघातांस निमंत्रण

बांदावासीय आक्रमक; रस्ता निर्धोक करण्याची बांधकामकडे मागणी

बांदा, ता. १६ ः पावसाळ्याच्या तोंडावर बांदा येथे गॅस पाईपलाईनसाठी करण्यात आलेली खोदाई वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने बरेच अपघात होत आहेत. यासंदर्भात येथील ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता, सावंतवाडी यांच्या कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी तत्काळ रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक करण्याची मागणी करण्यात आली.
संबंधित गॅस कंपनीकडून पाईपलाईन टाकण्याचे काम बांदा ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू आहे. रस्ते वाहतूक, शालेय विद्यार्थी तसेच दूरसंचार विभागाला या खोदाईमुळे अडचणी निर्माण झाली आहे. बांदा येथे सध्या काम अंतिम टप्प्यात आलेले असून संबंधित ठेकेदाराने प्रस्तावित उड्डाणपूल कट्टा कॉर्नर येथील कायम वर्दळीच्या ठिकाणी असणारा बाजूरस्ता मध्यभागी खोदून वाहतुकीस अडथळा व अपघात निमंत्रण परिस्थिती निर्माण केली आहे. संबंधित रस्त्याची मालकी राष्ट्रीय महामार्गाजवळ असून सर्वसामान्य लोकांना या संदर्भात अनेक प्रश्न पडलेले आहेत, असा आरोप करीत त्याची उत्तरे मिळावीत, असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य आगलावे यांनी दिले.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीचा असताना कोणताही शासकीय अधिकारी तिथे हजर नाही. भविष्यात प्रास्तावित उड्डाणपूल या कामामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा अगर आराखड्यात बदल करायचा झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला आहे. १५ मेपर्यंत रस्ता खोदाई व काम करण्यास शासन मान्यता असताना जून महिन्यात कामास पावसात परवानगी कोणी दिली? काम करण्यास जर आपण परवानगी दिली तर काम किती कालावधीत पूर्ण होणार व या कामामुळे झालेल्या रस्त्याच्या नुकसानीला जबाबदार कोण? अशा अनेक प्रश्नांसंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपअभियंताचे शाखा अभियंता आर. कांबळी यांना निवेदन दिले. रस्ता दुरुस्ती करून वाहतुकीस लवकरात लवकर निर्धोक न केल्यास पाईपलाईनचे उर्वरित काम पूर्ण करू देणार नाही, असा इशाराही आगलावे यांनी दिला. त्यानुसार शाखा अभियंत्यांनी त्वरित रस्ता दुरुस्तीचे आदेश ठेकेदार तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोलकर, गुरू कल्याणकर, शुभम कवठणकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, गजानन डेगवेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com