दुसर्‍या दिवशी भरली माळवाशीतील शाळा

दुसर्‍या दिवशी भरली माळवाशीतील शाळा

Published on

३५ (पान ३ साठी )

दुसऱ्या दिवशी माळवाशी शाळा सुरु

शिक्षक देण्याबाबत ग्रामस्थाना आश्वासन

साडवली, ता. १६ : माळवाशीतील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी जादा शिक्षक मिळाला नाही म्हणून पहिल्या दिवशी एकाही मुलाला शाळेत पाठवले नाही. गुरुवारी उशिरा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यानंतर दोन-तीन दिवसांत शिक्षक देण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे माळवाशीतील केंद्रशाळा दुसऱ्‍या दिवशी म्हणजे आज भरली.
शाळेसाठी शिक्षक द्या, अन्यथा आम्ही शाळेत मुलांना पाठवणार नाही, असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला होता. या गावात जिल्हा परिषदेची केंद्रशाळा असून १ ते ७ वी पर्यंत ५९ पटसंख्या आहे. सध्या तीन शिक्षक येथे कार्यरत असून आणखी एक शिक्षक मिळावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. शिक्षण विभागाला कल्पना देऊनही जादा शिक्षक न मिळाल्याने अखेर ग्रामस्थांनी शाळा पहिल्या दिवशी बंद ठेवली. आज शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर करंडे, प्रभारी मुख्याध्यापिका क्षमा साठे, स्नेहल गुरव, सोनाली सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने शिक्षक नेमावेत, अशी मागणी उपसरपंच सुनील सावंत व मधुकर करंडे यांनी शासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com