

४२ (पान ३ साठी)
एसटी मोटार अपघातात एकाचा मृत्यू
दाभोळ : एसटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकीला दिलेल्या धडकेत चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात दापोली तालुक्यातील उर्फी नजीक झाला. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असोंड येथील सुरेश भिकू पाटील हे त्यांच्या चारचाकीने उर्फी ते कोंडे असे जात असताना दापोली ते पांगारी एसटी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले, त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णलयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून ते मृत झाल्याचे सांगितले. या अपघाताची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.