‘पीएम किसान’ शिबिराचा लाभ घ्या ः कृषी विभाग
‘पीएम किसान’ शिबिराचा
लाभ घ्या ः कृषी विभाग
जिल्ह्यात २०, २१ जूनला आयोजन
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात होत आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये २० व २१ जूनला संपूर्णतः ‘पीएम किसान’चे काम करण्यासाठी गावोगावी कृषी सहाय्यकांमार्फत सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा पर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट खाते, बँका तसेच सामाईक सुविधा (CSC) हे सहभागी होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
केंद्राने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही. केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे राज्यात १ मेपासून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. राज्यात सद्यस्थितीत जवळपास १० लाख व १८ लाख लाभार्थींची अनुक्रमे बँक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. या शिबिराची पूर्वतयारी कृषी विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू असून कृषी सहाय्यकांना गावे वाटप करण्यात येऊन प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिराबाबत प्रत्येक गावामध्ये नोटीस लावणे, दवंडी देणे तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
प्रलंबित लाभार्थ्यांनी शिबिरात सहभागी होऊन त्यांची ई-केवायसी करण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने पीएम किसान पोर्टलवरील Farmers corner मधील ई-केवायसी- OTP आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्र (CSC) च्या मदतीने अथवा पीएम किसानच्या नवीन ॲपद्वारे Face authentication च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे. संबंधित लाभार्थ्याला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल तर शिबिरावेळी बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार संलग्न करावा किंवा शिबिरावेळी पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडावे व १४ व्या हप्त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

