जनता दलामार्फत ओबीसी 
जात पाहणी अहवाल स्पर्धा

जनता दलामार्फत ओबीसी जात पाहणी अहवाल स्पर्धा

Published on

जनता दलामार्फत ओबीसी
जात पाहणी अहवाल स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः जात गणनेच्या मागणीसाठी जनता दलातर्फे (युनायटेड) लवकरच रत्नागिरीत ओबीसी गोलमेज परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी मागास जातींच्या पाहणी अहवालासाठी स्पर्धा आयोजित करून
दीड लाखांहून अधिकची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती समन्वयक विनय खेडेकर यांनी दिली.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ओबीसी आणि अन्य मागास जाती समूह, संस्था, संघटना प्रतिनिधी, तरुणांनी आपापल्या जातींची आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक पाहणी करावी. यात संबंधित जिल्हा किंवा तालुक्यातील आपल्या जातीची विभागवार स्त्री-पुरुष एकूण लोकसंख्या, त्यांचे शिक्षणातील प्रमाण, गेल्या ३० वर्षांमध्ये झालेल्या स्थलांतराची स्थिती आणि संख्या (अंदाजित आकडेवारी), चाकरमानी म्हणून मुंबई आणि अन्य शहरात गेलेल्या लोकांची संख्या आणि त्यांची शहरात गेल्यानंतरची स्थिती, राजकारणात आपल्या जातीचा वा प्रतिनिधींचा सध्याचा हिस्सा, शिक्षण, सहकार आणि तत्सम संस्थांमध्ये आपल्या जातीची भागीदारी या संबंधीची आकडेवारी त्या त्या गावातून आणि त्या त्या ज्ञाती संस्थांनी जमा करायची आहे. पहिल्या १० उत्कृष्ट अहवालांना प्रत्येकी १० हजार, सर्वोत्कृष्ट दोन अहवालांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. अन्य संशोधनपर व्यक्तिगत लेखांना विशेष रोख पारितोषिके दिली जातील. या अहवालांच्या आधारावर कोकणातील ओबीसी आणि अन्य मागास जातींचा एकत्रित पाहणी अहवाल आणि संयुक्त अजेंडा रत्नागिरी येथे होणाऱ्या गोलमेज परिषदेत प्रसिद्ध केला जाणार आहे. याबाबतचा अहवाल १५ ऑगस्टपूर्वी मोईन साटविलकर, सी/ओ एम. एस. मेडिको, कांजीवरा, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या पत्त्यावर पाठवावा, असे समन्वयक खेडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.