गणित प्रज्ञा परीक्षेत
सोहनी साळसकरचे यश

गणित प्रज्ञा परीक्षेत सोहनी साळसकरचे यश

Published on

10068
सोहनी साळसकर

गणित प्रज्ञा परीक्षेत सोहनीचे यश
कुडाळ ः राज्य गणित अध्यापक मंडळातर्फे २९ एप्रिलला घेतलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत एस. एल. देसाई विद्यालय, पाटची विद्यार्थिनी सोहनी साळसकर हिने सिल्वर कॅटेगिरीमध्ये विशेष नैपुण्यासह प्रमाणपत्र प्राप्त केले असून जिल्ह्यातील एकूण सात प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश आहे. पाट हायस्कूलमध्ये गणित मंडळ, विज्ञान मंडळामार्फत विविध उपक्रम वर्षभर घेतले जातात. या विद्यार्थ्यांना सौ. निवतकर, श्री. कांबळे, श्री. सांगळे, सौ. बुरूड यांचे मार्गदर्शन लाभले. गणित अध्यापक मंडळाच्या कुडाळ येथे घेतलेल्या मार्गदर्शन वर्गाचाही फायदा झाला. संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष समाधान परब, कार्यवाह सुधीर ठाकूर, संस्था सदस्य गणपत नार्वेकर, देवदत्त साळगावकर, नारायण तळवडेकर, अवधूत रेगे, सुभाष चौधरी, संजय ठाकूर, राजेश सामंत, दीपक पाटकर, प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर आदींनी सोहनीचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.