कुडाळचा विकासरथ गतिमान करा

कुडाळचा विकासरथ गतिमान करा

Published on

10067
कुडाळ ः नगरसेवकांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते अतुल बंगे. सोबत अक्षता खटावकर, मंदार शिरसाट आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)


कुडाळचा विकासरथ गतिमान करा

अतुल बंगे ः नूतन नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः शहरात महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष आफ्रीन करोल यांनी ज्या पद्धतीने विकासात्मक काम केले, तसेच काम नूतन नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी करावे. त्यासाठी आमदार वैभव नाईक, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांचे मार्गदर्शन घेऊन विकासाचा रथ पुढे हाकावा, असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात बंगे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची नुकतीच बैठक झाली. यावेळी कुडाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष खटावकर यांचा ठाकरे शिवसेनेच्यावतीने बंगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, सई काळप, श्रुती वर्दम, श्रेया गवंडे, माजी नगरसेवक सचिन काळप, कुडाळ ओबीसी सेल शहर प्रमुख राजु गवंडे, कुडाळ युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, उपशहरप्रमुख गुरू गडकर, युवासेनेचे अमित राणे आदी उपस्थित होते.
यावेळी बंगे म्हणाले, ‘‘गेली कित्येक वर्षे कुडाळ शहराची खोळंबलेली कामे महाविकास आघाडीच्या काळात झाली. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शहराचा विकास आराखडा आता कृतीत उतरत आहे. उपनगराध्यक्ष शिरसाट यांच्या कुशल नेतृत्वाखाली शहराच्या विकासाची घौडदौड सुरू आहे.’’ यावेळी नूतन नगराध्यक्ष खटावकर यांनीही शहर सुंदर बनविण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही दिली.
--
सर्वांच्या सहकार्याने शहराचा कायापालट
श्री.बंगे म्हणाले, ‘‘शहराचे बालोद्यान, भंगसाळ बंधारा, मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह, क्रीडांगण, बॅडमिंटन यासारखी मोठी कामे आज खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष शिरसाट व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. यातून शहराचा कायापालट होत आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी कुणाचीही उणीधुणी काढण्यात वेळ वाया न घालविता शहरासाठी चांगले काम करण्यावर भर द्यावा. सर्वांच्या सहकार्यातून शहराचा विकास निश्चित साध्य होईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.