आज शास्त्रीय गायन मैफिल

आज शास्त्रीय गायन मैफिल

१५ (पान २ साठी, संक्षिप्त)


-rat१८p१७.jpg-
२३M१००९४
अथर्व कंठी, सौम्या क्षीरसागर, मीरा सोवनी, ऋग्वेदा हळबे.
---------
कलांगण, स्वराभिषेकतर्फे
रत्नागिरीत आज शास्त्रीय गायन मैफल

रत्नागिरी, ता. १८ : ज्येष्ठ संगीतकार वर्षा भावे संचालित कलांगण (मुंबई) आणि येथील स्वराभिषेक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १९) विशेष शास्त्रीय मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. थिबा पॅलेसजवळील प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर सायंकाळी ६.३० वाजता मैफल रंगणार आहे. मुंबई आणि रत्नागिरीतील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व व विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण होण्यासाठी स्वराभिषेक आणि कलांगण या दोन संस्थांतर्फे मुंबई आणि रत्नागिरी येथे एकत्रित मैफिलीचे आयोजन दर तीन महिन्यांनी केले जाते. या वेळची मैफल रत्नागिरीत होत आहे. यात अथर्व कंठी, सौम्या क्षीरसागर (दोघेही मुंबई), मीरा सोवनी, ऋग्वेदा हळबे (दोघीही रत्नागिरी) हे विद्यार्थी शास्त्रीय गायन करणार आहेत. त्यांना महेश दामले व तन्वी मोरे संवादिनीसाथ, केदार लिंगायत व राजू धाक्रस तबलासाथ करणार आहेत. यावेळच्या मैफिलीला वर्षा भावे उपस्थित राहणार आहेत. ही मैफल विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वराभिषेकच्या संचालिका विनया परब यांनी केले आहे.
-------

-rat१८p१९.jpg-
२३M१००९६
रत्नागिरी : तनया शिवलकर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करताना सरपंच आकांक्षा कीर, ग्रामसेवक माने, उपसरपंच उषा कांबळे आणि सदस्य आदी.
----------
तनया शिवलकर यांना शासनाचा
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

रत्नागिरी ः मिऱ्या येथील सामाजिक कार्यकर्त्या व भाजपा तालुका महिला आघाडीप्रमुख तनया शिवलकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाला. यानिमित्त मिऱ्या ग्रामपंचायत यांच्यावतीने गौरविण्यात आले.
तनया शिवलकर या सागरी सीमा मंचच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला आघाडी प्रमुख आहेत. त्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य असून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रोजगारविषयक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असतात. किनारपट्टीवर निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. क्रांतिज्योती आणि यशदा या संस्थेची मास्टर प्रशिक्षक म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे आहे. विविध सामाजिक संस्थामध्ये कार्यरत आहेत. ग्रामपंचायत हद्दीत सामाजिक काम करण्याऱ्या महिलांचा सन्मान करता यावा, यासाठी हा पुरस्कार शासनातर्फे यंदा प्रथमच जाहीर करण्यात आला. हा सन्मान मिळाल्याबद्दल तनया शिवलकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com