ः5 नद्यांमधून 10,90,000 घनमीटर गाळ उपसा

ः5 नद्यांमधून 10,90,000 घनमीटर गाळ उपसा

४ (पान २ साठी, मेन)

-rat१८p२१.jpg-
२३M१०१३२
चिपळूण ः वाशिष्ठी नदीत खेर्डी येथे काढण्यात आलेला गाळ.
-----------

पान नद्यांमधील गाळ उपसा पूर्ण


१० लाख ९० हजार घनमीटर उपसा ;जिल्ह्यात पूरनियंत्रण ; नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः जिल्ह्यात पावसाळ्यात ज्या नद्यांना पूर येतो अशा वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, बावनदी आणि अर्जुना नद्यांमधील गाळ उपसा पूर्णत्वाकडे गेला आहे. अलोरे यांत्रिकी विभागाच्यावतीने यावर्षी या नद्यांमधून १० लाख ९० हजार घनमीटर इतका गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पूरपरिस्थितीत त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टी आाणि महापुरात चिपळूण शहर, परिसराची मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाल्यानंतर या महापुराला कारणीभूत असलेल्या नद्यांतील गाळाचा प्रश्न पुढे आला. पुढे त्यातूनच चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून शहरवासीयांनी जनआंदोलन उभारले. जलसंपदा विभागाने वाशिष्ठीनदीतील प्रवाहाला ठरणारे अडथळे, बेटे, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना हाती घेतली.
पहिल्या टप्प्यात वाशिष्ठीत राज्यभरातील यंत्रसामुग्री लावून उपसा करण्यात आला. शिवनदीतून २ लाख २० हजार ९४० घनमीटर तर वाशिष्ठी नदीतील ५ लाख ५० हजार ५१४ घनमीटर, बहादूरशेख नाका येथील बेटावरील सुमारे ३५ हजार घनमीटर असे एकूण ८ लाख घनमीटर गाळ गतवर्षी काढला गेला. नद्यांचे खोलीकरण आणि रूंदीकरण झाल्यामुळे गतवर्षीच्या पावसाळ्यात नदीतील पाण्याला योग्य दिशा मिळाली होती. यापूर्वी १०० मिलीमीटर पाऊस कोसळला तरी शहरात पुराचे पाणी घुसायचे; मात्र गाळ उपसानंतर परिस्थिती बदललेली दिसली.

यावर्षी नोव्हेंबरपासून यांत्रिकी विभाग अलोरेने जिल्ह्यातील काही प्रमुख नद्यांतील गाळ उपशाला सुरवात केली. वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, बावनदी आणि अर्जुना या प्रमुख नद्यांना पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे बाजारपेठेतील दुकानांसह नागरिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे यावर्षी जिल्हा नियोजन समिती, जलसंपदा विभागामार्फत पूरनियंत्रण अंतर्गत नद्यांतील गाळ उपशासाठी निधी मंजूर करण्यात आला. यांत्रिकी विभागाने पोकलेन, बुलडोझर आणि डंपर यांचा प्रभावी वापर करून संगमेश्वर, चिपळूण, लांजा आणि राजापूर या तालुक्यातील गाळ उपसा मार्गी लावला.
-----
जिल्ह्यात १३ ठिकाणी गाळ उपसा
वाशिष्ठी, वैतरणा नदीतील खांदाटपाली, रत्नागिरीतील काजळी नदीवरील चांदेराई, देवडे, बावनदीवरील उक्षी-वांद्री, शास्त्रीनदीवरील पैसाफंड शाळा ते संगम, गुहागरमधील पोरी आगार स्थानिक नदी, मिरजोळे स्थानिक नदी, अर्जुना नदीवरील राजापूर, रायपाटण, येरडव, कोदवली (गोडी) नदी, भांबेड येथील स्थानिक नदी आदी १३ ठिकाणी नोव्हेंबरपासून यांत्रिकी विभागाने १० लाख ९० हजार घनमीटर गाळ उपसला.
---
कोट
वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, बावनदी आणि अर्जुना नदी गाळाने भरल्याने त्यांची वहनक्षमता कमी झाली होती. आता नद्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात निघाल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.
- जावेद काझी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग अलोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com