क्षमता ओळखून करिअर निवडा

क्षमता ओळखून करिअर निवडा

Published on

10137
आडाळी : विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. रुपेश पाटकर. बाजूला पराग गावकर, अमोल परब, सानिका गावकर, विशाखा गावकर, संजना गावकर आदी.

क्षमता ओळखून करियर निवडा

डॉ. रुपेश पाटकर; आडाळीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कळणे, १८ : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्षमता शोधल्या पाहिजेत. त्यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अंतर्मुख व्हायला शिकविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी आडाळी येथे व्यक्त केले.
ग्लोब ट्रस्ट, आडाळी व ग्रुप ग्रामपंचायत आडाळी-फोंडीये यांच्या संयुक्त विद्यमाने गुणगौरव समारंभ काल (ता. १८) झाला. यावेळी आडाळीतील दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाल व भेटवस्तू देऊन डॉ. पाटकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष तथा सरपंच पराग गावकर, उपसरपंच परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य संजना गावकर, अमोल परब, सानिका गावकर, विशाखा गावकर, निशा गावकर, पोलिस पाटील संतोष परब आदी उपस्थित होते. यावेळी ‘गुण, गुणवत्ता आणि करियर’ या विषयावर डॉ. पाटकर यांचे व्याख्यान झाले.
डॉ. पाटकर यांनी विद्यार्थ्यांना काय आवडते याचा शोध न घेता उच्च शिक्षणाची दिशा ठरवल्यास भविष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून करियरची दिशा ठरवा, असे आवाहन केले. कार्यक्रमाची भूमिका मांडताना सरपंच गावकर म्हणाले, ‘‘नव्या शिक्षण व्यवस्थेत गुणांना महत्त्व आले; पण त्यातून फसगत होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्यातील गुणवत्ता काय आहे, हे तपासून करियर निवड व्हायला हवी. याबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी गुणगौरवाच्या निमित्ताने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला.’’ यावेळी वेदिता गावकर, सोनाली डोईफोडे, पल्लवी गावकर, पूर्वा परब, ऋतुजा मेस्त्री, साक्षी गावकर, साक्षी सावंत, यश सावंत, निधीश सावंत, कृष्णा गावकर, विराज गावकर, सुमित कदम, सुयश परब, अक्षद गावकर, संतोष जंगले, साईश जंगले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.