कणकवली, वैभववाडीसह
देवगडात वारस तपास मोहीम

कणकवली, वैभववाडीसह देवगडात वारस तपास मोहीम

Published on

कणकवली, वैभववाडीसह
देवगडात वारस तपास मोहीम
कणकवली,ता.१८ ः ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यात मृत खातेदारांचा वारस तपास करण्यासाठी २० ते २० जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी दिली. मृत खातेदारांचे वारस तपास करण्यासाठी त्यांचे वारस अर्जाद्वारे मागणी करून त्यानंतर अधिनियमातील तरतुदीच्या आधारे विहीत प्रक्रिया पार पाडून वारस तपास करण्यात येतो. तथापी वारस तपास करण्यासाठी वारसांनी अर्ज दाखल न करणे, किंवा अन्य कारणांमुळे प्रलंबीत राहिलेला आहे. त्यामुळे कित्येक मिळकती अद्यापही मृत खातेदारांच्याच मालकी हक्कामध्ये दिसून येतात. अशा खातेदारांचा वारस तपास होऊन त्यांचा मालकी हक्क निश्चित करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत अथवा गटविकास अधिकाऱ्यांकडून मागील पाच वर्षातील गावनिहाय मयत खातेदारांची यादी प्राप्त करून घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर यादी व गाव नमुना आठ अ यांचे वाचन करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन १९ ते २३ जून २०२३ या कालावधीत करण्यात यावे, अशाही सूचना दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.