दापोलीत आठवड्यातून एकदाच पाणी

दापोलीत आठवड्यातून एकदाच पाणी

Published on

पान 8 साठी

दापोलीत मिळणार आता
आठवड्यातून एकदाच पाणी
पाऊस लांबल्याचा परिणाम; नारगोली धरणाने गाठला तळ
दाभोळ, ता. १८ : पावसाळा सुरू झाला असला तरी दापोली तालुक्यात कुठेही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई कायम असून दापोलीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पावसाचे आगमन झाल्यावर शेतकाऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली असून भात पेरणीच्या कामाला गती आली आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणात पाणी शिल्लक नसल्याने दापोलीकरांना तीव्र टंचाइला तोंड द्यावे लागत आहे. नगरपंचायतीकडून दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता आठवड्यातून एकदा केला जात असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. जोपर्यंत मोठा पाऊस पडत नाही व नारगोली धरणातील साठ्यात वाढ होत नाही, तोपर्यंत नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. दापोली तालुक्यातील सहा गावांना अद्याप पाणी टंचाइचा सामना करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.