गुणवंत विद्यार्थ्यांचा
जामसंडे येथे गौरव

गुणवंत विद्यार्थ्यांचा जामसंडे येथे गौरव

Published on

१०१६३
गुणवंत विद्यार्थ्यांचा जामसंडे येथे गौरव
देवगड ः जामसंडे-मळई येथील जय बजरंग स्पोर्टस् क्लबतर्फे हनुमान मंदिर येथे दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाल मंडळ संगीत मेळा मळई मंडळाचे अध्यक्ष संजय कोळंबकर, उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, प्रदोष कोयंडे, मोहन कोयंडे, मुरारी भाबल, पंढरीनाथ कोयंडे, दीपक सारंग, सूरज कोयंडे, प्रशांत ऊर्फ पप्पू भाबल, नंदकुमार वाडेकर, रुपेश मणचेकर, दीपराज मेस्त्री, दादू वाडेकर, महेश मेस्त्री आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना जय बजरंग स्पोर्टस क्लबतर्फे वह्या संच व पेन देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी थोरांचे विचार आत्मसात करून यशाची झेप घ्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कोळंबकर यांनी यावेळी केले.
--
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ततेचे आवाहन
देवगड ः तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेतंर्गत लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी केले आहे. वारंवार सांगूनही ई-केवायसी करणार नाहीत, असे लाभार्थी अपात्र घोषित करण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या पी.एम. किसान योजनेचे वार्षिक रुपये ६ हजार व राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे वार्षिक ६ हजार रुपये असे एकत्रित वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठीच्या आवश्यक निकषांची पूर्तता वेळीच करावी. जेणेकरून या दोन्ही योजनांच्या एकत्रित वार्षिक १२ हजार रुपये या लाभापासून वंचित राहू नयेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन ढेपे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.