-हर्णैमधील मल्लखांब स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

-हर्णैमधील मल्लखांब स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

३० (पान ५ साठी)

हर्णैमधील मल्लखांब स्पर्धा उत्साहात
दाभोळ, ता. १८ : दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन दापोली व सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ हर्णै यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मल्लखांब दिनानिमित्त तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगटात स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. १२ वर्षाखालील मुलींच्या गटात अनुक्रमे मानवी कुलाबकर, राधिका दुसार, रिद्धी पटवा, मुलांमध्ये रुद्र सावंत, मित कुलाबकर, साई गुरव, १४ वर्षाखालील मुले- वेदांत राणे, आयुष जांभळे, साईप्रसाद वराडकर, मुलींच्या गटात- खुशी पटवा, आकांशा पटवा, अदिती सावंत, १८ वर्षाखालील मुलगे- सोहम कदम, भूपेंद्र रेवाळे, मुली- पूर्वा कुलाबकर, पूजा राजभर, कस्तुरी बोटे व प्रितमा पटवा यांनी क्रमांक पटकावले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अध्यक्ष मनोज पवार, चंद्रकांत शेडगे, संदेश चव्हाण व निकेत बांद्रे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.