क्राईम

क्राईम

Published on

पान ३ साठी

तरुणीशी गैरवर्तन, रिक्षाचालकाला कोठडी
रत्नागिरी : रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या‍ रिक्षा चालकाला न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. अविनाश म्हात्रे (३५, रा. शांतिनगर, रत्नागिरी) असे संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवार १३ जूनला दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास जयस्तंभ ते कुवारबावकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते.


भाटीमिऱ्यात एकाची आत्महत्या
रत्नागिरी ः शहरानजीकच्या भाटीमिऱ्‍या येथील प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता उघडकीस आली. संतोष विजय लाड (४५, रा. भाटीमिऱ्‍या, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ विक्रम सुभाष लाड याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संतोष शनिवारी (ता. १७) रात्री घरातून निघून गेला होता. त्याचे नातेवाईक त्याचा सर्वत्र शोध घेत असताना रविवारी सकाळी भाटीमिऱ्‍या येथील म्हसोबा मंदिराजवळील झाडाला संतोष नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत संतोषचा चुलत भाऊ विक्रम लाडने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.