आंजर्ले ते आडे खाडीदरम्यान एनए प्लॉटिंगवर हवी बंदी
पान ३ साठी
आंजर्ले ते आडे खाडीदरम्यान एनए प्लॉटिंगवर हवी बंदी
पर्यावरण विभागाकडून दखल ; १५ ते ३५ कोट आंबा उत्पन्नाचे केंद्र
दाभोळ, ता. २८ ः दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी ते आडे खाडीदरम्यानच्या भागाला फळबागा आणि शेतीसाठी १०० टक्के आरक्षित प्रदेश घोषित करून या भागात व्यावसायिक एनए प्लॉटिंगवर कायमची बंदी घालण्यासंदर्भातील मागणी दापोली तालुक्यातील मुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी विनय जोशी यांनी राष्ट्रीय हरित लवाद (NGT) व केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांच्याकडे एका याचिकेद्वारे केली होती. त्याची दखल केंद्रीय पर्यावरण विभागाने घेतली असून, राज्याच्या वनविभागाचे प्रधान सचिव यांना या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.
दापोली तालुक्यातील आंजर्ले परिसरातील मुर्डी, आंजर्ले, सुकोंडी, देहेण, वेळवी, कादिवली, बोरथळ, लोणवडी, पाडले, आडे, उटंबर, केळशी, मांदिवली, आंबोली, वेळास, बाणकोट, वेसवी या आंब्यासाठी प्रसिद्ध अत्यंत सुपिक पट्ट्यातून दरवर्षी हापूस आंब्याच्या एक लाख पेट्यांची साधारण किंमत १५ ते ३५ कोटी रुपये या राज्यभर घाऊक आणि किरकोळ बाजारात विकल्या जातात. बेसुमार जंगलतोड, जेसीबीद्वारे डोंगरांची अंदाधुंद नासाडी आणि एनए प्लॉटिंग स्कीम्स या बाबी आंबापिकासाठी डोकेदुखी ठरत आहेत आणि भविष्यात यात अजून राक्षसी वाढ होणार असून, आंब्यावर आधारित घरगुती आणि मोठे उद्योग यामुळे मोठ्या अडचणीत येत आहेत.
या भागात पूर्वी कधीही न झालेला वानर, माकड, रानडुकरे यांचा शेतीला होणारा असह्य त्रास आणि नुकसान, बेसुमार वृक्षतोड करून जेसीबी, पोकलेन आदींच्या साहाय्याने होणारे डोंगरांचे सपाटीकरण आणि विध्वंस यामुळे शेतीला मारक ठरणारे वन्यप्राणी आणि थेट माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारे बिबटे आणि गव्हे यांचा मानवी वस्तीत होणारा खुला वावर यामुळे भात, नारळ, सुपारी, आंबा, काजू या पिकांची अपरिमित हानी होत आहे.
वृक्षतोड कारणीभूत
या सगळ्याच्या मागे या भागात होणारी नियोजनशून्य वृक्षतोड आणि एनए प्लॉटिंग स्कीम्स जबाबदार असल्याचा निष्कर्ष नागरिकांनी काढला आहे. त्यामुळे या भागातील एनए प्लॉटिंगला सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे परवानगी देऊ नये आणि स्थानिक शेती वाचवावी, अशी मागणी जोशी यांनी याचिकेद्वारे केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.