शून्य शिक्षकी शाळांत शिक्षक 
न दिल्यास १७ ला आंदोलन

शून्य शिक्षकी शाळांत शिक्षक न दिल्यास १७ ला आंदोलन

Published on

13580
सिंधुदुर्गनगरी ः शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांना निवेदन देताना ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आदी.

शून्य शिक्षकी शाळांत शिक्षक
न दिल्यास १७ ला आंदोलन

ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्ह्यातील सर्व शून्य शिक्षकी जिल्हा परिषद शाळांमध्ये १५ जुलैपर्यंत शिक्षक नियुक्त न झाल्यास १७ ला जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गट शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिला.
ठाकरे शिवसेनेतर्फे आज जिल्हाप्रमुख पडते, अतुल बंगे, राजू गवंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेत शिक्षक नियुक्तीबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, काही दिवसांपूर्वीच खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे जिल्ह्यात शंभरहून अधिक शाळा शून्य शिक्षकी झाल्याबाबत लक्ष वेधले होते. त्या शाळांतील मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही केली होती. यावेळी सात दिवसांत मानधन तत्त्वावर शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून दिले होते; परंतु अद्याप या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध झालेले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येत्या १५ पर्यंत जिल्ह्यातील शून्य शिक्षकी सर्व शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास १७ ला जिल्हा परिषद कार्यालयसमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.