डॉक्‍टरांची रिक्‍तपदे भरण्याकडे दुर्लक्ष

डॉक्‍टरांची रिक्‍तपदे भरण्याकडे दुर्लक्ष

Published on

13597
कणकवली : येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी यांच्याशी चर्चा करताना सुशांत नाईक, कन्हैया पारकर व इतर शिवसेना पदाधिकारी.


डॉक्‍टरांची रिक्‍तपदे भरण्याकडे दुर्लक्ष

सुशांत नाईक; आमदार राणेंची कणकवलीत केवळ स्टंटबाजी

कणकवली, ता.३ : डॉक्‍टरांची रिक्‍तपदे भरण्याबाबत ठोस भूमिका घेण्याऐवजी आमदार नीतेश राणे, कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात येऊन केवळ स्टंटबाजी करत आहेत. खरं तर स्वत:च्या खासगी रूग्‍णालयात रूग्‍ण यावेत यासाठी त्‍यांचे शासकीय रूग्‍णालयांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले असल्‍याचा आरोप युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज केला.
आमदार नीतेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी उपजिल्‍हा रूग्‍णालयात जाऊन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रूग्‍णसेवेबाबत फैलावर घेतले होते. त्‍याअनुषंगाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेनाच्या शिष्टमंडळाने सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, योगेश मुंज, सचिन आचरेकर, वैभव मालंडकर, तेजस राणे, सोहम वाळके, नितेश भोगले आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा केल्‍यानंतर श्री.नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, राज्‍यमंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आमदार नीतेश राणे हे उपजिल्‍हा रूग्‍णालयात येऊन स्‍टंटबाजी करत आहेत. त्‍यांना रूग्‍णांची खरच काळजी असेल तर मंत्रिपदाच्या मागे फिरण्यापेक्षा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक असणारी साधनसामुग्री आणि रिक्त असलेली डॉक्टरांची पदे भरण्यासाठी प्रयत्‍न करावेत. राणेंचे पडवे येथे खासगी हॉस्पिटल आहे. तेथे सर्व रूग्‍ण जावेत यासाठी ते उपजिल्‍हा रूग्‍णालयातील सुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत. दुसरीकडे रूग्‍णालयात येऊन स्टंटबाजी करत आहेत.
---
खासदार राऊत, नाईक यांची मदत घेऊ
श्री.नाईक म्‍हणाले, डॉ. धर्माधिकारी यांच्याशी चर्चा केल्‍यानंतर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात १७ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांपैकी केवळ ३ पदे भरलेली आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, फिजिशियन ही तातडीची आणि अत्यावश्यक पदे रिक्त आहेत. याखेरीज नवजात बालकांना श्वसनाचा त्रास झाल्यास लागणारा निओनेटल व्हेंटिलेटर, वर्कस्टेशन ऍनस्थेशिया मशीन, हाडांच्या ऑपरेशनसाठी आवश्यक सीआर्म मशीन, एक्सरे लेझर प्रिंटर, लेप्रास्कोप मॉनिटरसह, ऑर्थोपेडीक ऑपरेशनसाठी लागणारी सर्व साधनसामुग्री उपलब्‍ध नाही. ही सर्व यंत्रसामग्री आल्‍याखेरीज उपजिल्‍हा रूग्‍णालयात योग्‍य उपचार होऊ शकत नाहीत. दरम्‍यान, उपजिल्‍हा रूग्‍णालयातील रिक्त पदे आणि अत्यावश्यक साधनसामुग्री खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही श्री.नाईक यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.