जिल्ह्यामध्ये ३६०९ टन 
खताची विक्री ः झगडे

जिल्ह्यामध्ये ३६०९ टन खताची विक्री ः झगडे

जिल्ह्यामध्ये ३६०९ टन
खताची विक्री ः झगडे

सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्ह्यात आतापर्यंत विविध प्रकारचे १२,०८९ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत ३६०९ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. यावर्षी वेळेत खत पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी जे. बी. झगडे यांनी दिली.
जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले १८ हजार ५८९ मेट्रिक टन खताची शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने आतापर्यंत १२ हजार ०८९ मे.टन एवढे खत उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये युरिया ५६६३ मेट्रिक टन, डीएपी ३२८, एमओपी ३५०, संयुक्त खते ४३३३, सुपर फॉस्फेट १४१३ मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. त्यापैकी आतापर्यंत विविध खरेदी विक्री संघामार्फत ३६०९ मेट्रिक टन एवढ्या खताची विक्री झाली आहे. अद्यापही ८४७९ मेंट्रिक टन खत शिल्लक आहे. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात विविध खते उपलब्ध झाली आहेत. सर्व तालुक्यात खत पुरवठा झाला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक खत विक्री संघाकडून खताची खरेदी करावी. बोगस खतापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन झगडे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com