गुरुपौर्णिमेनिमित्त केसरकरांनी
माडखोल येथे घेतले साईदर्शन

गुरुपौर्णिमेनिमित्त केसरकरांनी माडखोल येथे घेतले साईदर्शन

13635
माडखोल ः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी साईंचे दर्शन घेतले.

गुरुपौर्णिमेनिमित्त केसरकरांनी
माडखोल येथे घेतले साईदर्शन
सावंतवाडी ः गुरुपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माडखोल येथील प्रतिशिर्डीला पायी जाऊन साईंचे दर्शन घेतले. साईंची पालखी खांद्यावर घेऊन मंत्री केसरकर माडखोलच्या दिशेने रवाना झाले. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्यांच्या येथील निवासस्थानी पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी मंत्री केसरकर व त्यांच्या पत्नी ‌पल्लवी केसरकर यांच्या हस्ते महाआरती झाली. मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानाहून आज सकाळी माडखोल येथील प्रतिशिर्डीच्या दिशेने पालखी रवाना झाली. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सुधीर धुमे, दत्ता सावंत आदी साईभक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
................
13636
सावंतवाडी ः भटवाडी येथे विठ्ठल स्नानाचा सोहळा झाला.

सावंतवाडीत हरिनाम सप्ताहाची सांगता
सावंतवाडी ः कोकणातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहाची सांगता भटवाडी येथील चंद्रभागेच्या तीरावर झाली. पालखी भटवाडी येथे पोहोचल्यावर तीरावर विठ्ठल स्नानाचा सोहळा झाला. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यानंतर भटवाडी येथील विठ्ठल मंदिरात भजन, आरतीनंतर सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com