शरद पवारांसोबत राहण्याचा वेंगुर्लेत निर्धार

शरद पवारांसोबत राहण्याचा वेंगुर्लेत निर्धार

Published on

13702
वेंगुर्ले ः शरद पवार यांच्यासोबत असल्याची पक्षीय प्रतिज्ञापत्रे अर्चना घारे-परब यांच्याकडे भरून देताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.

शरद पवारांसोबत राहण्याचा वेंगुर्लेत निर्धार

राष्ट्रवादी कार्यकर्ते; मुंबईतील उद्याच्या बैठकीस जाणार

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी आज तातडीने आयोजित केलेल्या तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष सभेत ‘‘आम्ही सर्व शरद पवार यांचेच नेतृत्व काल मानत होतो, आजही मानत आहोत, अन् उद्याही मानणार’’ असल्याचा निर्धार जाहीर केला. यावेळी ‘शरद पवार आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी उपाध्यक्ष अजित नातू, राष्टवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, जिल्हा सदस्य नितीन कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी तालुका अध्यक्ष आबा टांककर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष फैयाज शेख, महिला तालुकाध्यक्षा दिपिका राणे, महिला शहर अध्यक्षा सुप्रिया परब, युवती शहर अध्यक्ष अपूर्वा परब, शहर सचिव स्वप्नील रावळ, बाबतीस डिसोजा, ज्येष्ठ सदस्य बबन पडवळ, सुभाष तांडेल, आनंद मुळीक यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी सौ. घारे-परब यांनी शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आहेत आणि आपण त्यांच्याच संघटनेत काम करणार आहोत. आपल्यांत कुणीही संभ्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण ठामपणे त्यांच्याचबरोबर असल्याचे पक्षीय प्रतिज्ञापत्रातून लेखी स्वरूपांत स्वमर्जीने कोणताही दबाव न येता ती देण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार तात्काळ सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी आपली प्रतिज्ञापत्रे घारे-परब यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी घारे-परब यांनी, मुंबई येथे पवारांनी बुधवारी (ता.५) आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी जाण्याबाबत विचारणा केली असता सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या बैठकीस उपस्थित रहाण्याचे जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.