‘स्वच्छ सर्वेक्षण’चे आज मूल्यमापन

‘स्वच्छ सर्वेक्षण’चे आज मूल्यमापन
Published on

‘स्वच्छ सर्वेक्षण’चे आज मूल्यमापन

राज्यस्तरीय समिती; १५ ग्रामपंचायतींची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामिण) २०२३ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे नामांकन राज्य व केंद्र स्तरावर होणार आहे. या अंतर्गत राज्यस्तर तपासणीकरीता तपासणी समिती उद्या (ता.५) जिल्ह्यात दाखल होत असून १५ ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी ही माहिती दिली.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत ग्रामपचायतींची तपासणी तीन गटात करण्यात येणार आहे. यामध्ये २००० पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती, २००० ते ५००० लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती व ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती असा निकष ठेवला आहे. तालुकास्तरावरुन प्रत्येक गटातील पाच ग्रामपंचायतींची जिल्हास्तरासाठी निवड केली होती. जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील तालुकास्तरावरुन निवड केलेल्या ग्रामपंचायती वरीलपैकी तीन गटात प्रति गट पाच याप्रमाणे १५ ग्रामपंचायतीची राज्यस्तरासाठी निवड केली आहे. यासाठी ऑनलाईन प्रणालीवर एक प्रश्नावली केंद्राकडून तयार केली होती. याच प्रणालीच्या माध्यमातून तालुका व जिल्हास्तराची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत साडपाणी घनकचरा व्यवस्थापन व हागणदारी मुक्त अधिक या विषयावर ऑनलाईन ५०० मार्कची प्रश्नावली ऑनलाईन प्रणालीवर तयार करण्यात आली होती. उद्यापासून ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतीची राज्यस्तराकरीता तपासणी होणार आहे, अशी माहिती विनायक ठाकुर यांनी दिली आहे.
-----------
चौकट
या ग्रामपंचायतींची होणार तपासणी
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत देवगड तालुक्यातील दाभोळे व बापर्डे, कणकवली तालुक्यातील लोरे, कोळोशी, कलमठ, मालवण तालुक्यातील गोळवण, कुडाळ तालुक्यातील कसाल, कुंदे व माणगाव, वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार, उभादांडा, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, मळेवाड तर वैभववाडी तालुक्यातील सडूरे ग्रामपंचायतीची राज्यस्तर तपासणीसाठी निवड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com