राजापूर ःसाखर विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांनी दिला प्रोजेक्टर

राजापूर ःसाखर विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांनी दिला प्रोजेक्टर

Published on

फोटो ओळी
-rat६p७.jpg ः३M१४२५२ राजापूर ः प्रशाळेला प्रोजेक्टर भेट देताना माजी विद्यार्थी.
-----------

साखर विद्यालयाला
माजी विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्टर
राजापूर, ता. ६ ः तालुक्यातील साखर येथील नाथ पै माध्यमिक विद्यालयाच्या १९८३ ते १९९३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी प्रशाळेला नवीन प्रोजेक्टर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. या प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रशाळेतील विद्यार्थी आता आधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुले करणार्‍या साखर येथील नाथ पै माध्यमिक विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आयुष्याची अन् जीवनाची नवी दिशा मिळवली आहे. ज्या शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले त्या शाळेला माजी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टर भेट देऊन त्या द्वारे एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रशालेमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्टर शाळेला भेट दिला. माजी विद्यार्थी तुळशीदास गुरव यांनी शाळा व गावातील सुरवातीच्या दिवसांना उजाळा देताना त्या वेळची स्थिती नेमकी कशी होती? याबाबत सविस्तर माहिती दिली. संदीप घाडी याने अभंग गाऊन सर्वांची मने जिकली. मिलिंद घाडी याने अभ्यास कसा करावा या विषयी जीवनविद्याचे मार्गदर्शन केले तर, जगदीश चव्हाण याने शिल्पकाराची कथा सांगून विद्यार्थ्यांना जीवन घडवण्याचा कानमंत्र दिला. या वेळी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आनंदा मोरे, श्रीकृष्ण मयेकर, विद्यमान मुख्याध्यपिका रेणुका राणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक क्रांती बाणे यांनी, आभार प्रतीक्षा वाईम यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.