चित्रकला स्पर्धेत
नील बांदेकरचे यश

चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे यश

१४२६४
चित्रकला स्पर्धेत
नील बांदेकरचे यश
बांदा ः अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित आषाढी एकादशीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत केंद्रशाळा बांदा नंबर १ चा पाचवीतील विद्यार्थी नील बांदेकर याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. चित्रकलेचा विषय ''चंद्रभागेच्या तीरी उभा पांडुरंग'' असा होता. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांमधून नीलने प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याच्या नावलौकिक वाढविला. त्यासाठी त्याला त्याचे मामा बालरोग तज्ज्ञ डॉ. उमेश सावंत यांचे असे मार्गदर्शन लाभले. नीलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत. यासाठी त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नगर वाचनालयामार्फत
कणकवलीत वृक्षारोपण
कणकवली ः वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात. त्यामुळे वृक्षांची लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक झाड लावून ते जगवावे. वृक्षप्रेमींनी नागरिकांना वृक्षाचे महत्त्व सांगून वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन डी. पी. तानवडे यांनी केले. शासनाच्या वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य वैयजंती करंदीकर, दत्तात्रय गावडे यांच्यासह वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com