पाट गावासाठी दहा लाख मंजूर

पाट गावासाठी दहा लाख मंजूर

Published on

पाट गावासाठी दहा लाख मंजूर
कुडाळः सिंधुरत्न योजनेमध्ये आमदार वैभव नाईक यांनी शिफारस करून तालुक्यातील पाट गावातील मारुती मंदिर गोसावीवाडी येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी १० लाख रुपये मंजूर करून घेतले. लवकरच हे काम पूर्णत्वास जाणार असून येथील विद्युत समस्या मार्गी लागणार आहे. पाट गावात कमी विद्युत दाबाची समस्या होती. त्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अतुल बंगे, उपविभाग प्रमुख महेश वेळकर व स्थानिक ग्रामस्थांनी आमदार नाईक यांच्याकडे विद्युत ट्रान्सफॉर्मरसाठी पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन आमदार नाईक यांनी सिंधुरत्न योजेनेमध्ये या कामाची शिफारस करून ट्रान्सफॉर्मरसाठी १० लाख रुपये मंजूर केले. त्याबद्दल अतुल बंगे, महेश वेळकर व ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.
...............
वेंगुर्लेकर महाविद्यालयात गुरुपौर्णमा साजरी
कुडाळः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. भाग्यश्री गावडे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी सेजल जाधव (टीवाय बीबीआय.), कविता चव्हाण (टी. वाय. बी. कॉम), ग्रेसी पिंटो (टी. वाय. बी. बी. आय.), रोहन सावंत (एस. वाय. बीकॉम), रोशनी तिळवे (टी. वाय. बी. कॉम) यांनी जीवनातील गुरुचे स्थान व महती सांगणारी भाषणे केली. प्रा. स्मिता पर, ग्रंथपाल सुशांत वालावलकर यांनी विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल सुशांत वालावलकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमेय पाटकर, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. भाग्यश्री गावडे, प्रा. डी. व्ही. गावडे, आयटी विभाग प्रमुख प्रा. तन्वी सिंघन उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डी. व्ही. गावडे यांनी केले. प्रा. श्रुती कोदे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.