वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक पाऊस

वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक पाऊस

Published on

वेंगुर्ले तालुक्यात
सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक १३५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ११५.९ मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण सरासरी ८४९.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चौवीस तासात व कंसात आतापर्यतचा तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा ः देवगड- ११४.५ (८५६.५), मालवण-१०९.९ (८६५.१), सावंतवाडी-११८.१ (९८६.६), वेंगुर्ले-१३५.६ (८६६.२), कणकवली-१११.८ (७३२.१), कुडाळ-१०४.७ (८३०.७), वैभववाडी-१३५.१ (८०१.७), दोडामार्ग-११२.८ (८८५.८) असा पाऊस झाला आहे.
---------------
बौद्ध संघटनेतर्फे
रविवारी गुणगौरव
सावंतवाडीः सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेतर्फे येत्या रविवारी (ता.९) बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ओरोस येथे आयोजित केला आहे. बौद्ध समाजातील चालू शैक्षणिक वर्ष एसएससी परीक्षेत किमान ७५ टक्के, बारावी परीक्षेत किमान ६० टक्के शिवाय पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सामाजिक न्यायभवन सभागृहात सकाळी १०.३० वाजता होणार आहे. यावेळी समाजातील सेवानिवृत्त झालेल्या व मान्यवरांचा गुणगौरवही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांनी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे सचिव मोहन जाधव व अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी एका निवेदनातून केले आहे.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.