देवरूख उत्कर्ष मंडळातर्फे मातृमंदिर संस्थेचा गौरव

देवरूख उत्कर्ष मंडळातर्फे मातृमंदिर संस्थेचा गौरव

Published on

फोटो ओळी
-rat५p१.jpg -KOP२३M१३९७० देवरूख ः उत्कर्ष मंडळातर्फे मातृमंदिर संस्थेचा गौरव करण्यात आला.

उत्कर्ष मंडळातर्फे
मातृमंदिर संस्थेचा गौरव
देवरूख, ता. ६ ः मातृमंदिरच्या सामाजिक कामाचा वारसा नव्या जोमाने पुढे जात आहे. या कामाला अधिक बळ देण्यासाठी आम्ही मंडळातर्फे मातृमंदिरचा गौरव करत आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी देवरूख येथे केले. संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे मातृमंदिर देवरूख या संस्थेचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मातृमंदिर संचलित गोकूळ अनाथालयातील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातील मुंबईकर चाकरमान्यांनी एकत्र येऊन गावासाठी काही केलं पाहिजे, या भावनेतून उत्कर्ष मंडळ सुरू केले. मागील ३३ वर्ष या मंडळाच्या माध्यमातून काम केले. मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप केले जाते. तीन तालुक्यातील १०० शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी साहित्य दिले जाते. गोकुळमधील मुलींनाही मदत केली जाते. यावर्षी मदत वाटपासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातृमंदिर संस्थेचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांच्या हस्ते व मंडळाचे सेक्रेटरी मधुकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मानपत्र देण्यात आले. शिक्षिका भोसले यांनी मानपत्राचे वाचन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.