संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

घेरापालघड-शिंदेवाडीतील
डोंगरमाथ्यावर वृक्षारोपण
खेड ः ग्रामीण विकास मंडळ घेरापालघड शिंदेवाडी यांच्या माध्यमातून मागील चार महिन्यापासून आपल्या गावात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणी अडवा पाणी जिरवा हे उद्दिष्ट ठेवून शिंदेवाडीच्या वरील बाजूस डोंगरमाथ्यावर असलेल्या मोकळ्या जागेवर सीसीटी खड्डे व वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, काजू, आवळा, खैर, साग, बेल, जांभूळ या प्रकारचे झाडे लावण्यात आली. या कामासाठी गावच्या माहेरवाशीन तसेच पाणी फाउंडेशनच्या (नंदाताई) मंजिरी मोरे यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली जगदीश दादा शिंदे यांच्या पुढाकाराने हे काम होत आहे. जल फाउंडेशन कोकण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात नितीन जाधव, सचिन काते, वसंत मोरे, चंद्रकांत मोरे, दीपक सकपाळ, प्रवीण साळुंखे, आतीश गोठल, किशोर ठसाळ सहभागी झाले होते.

शेतकरी प्रकाश शिंदेंचा सन्मान
खेड ः तालुका पंचायत समिती कृषी विभागामार्फत सन 2021-22 मध्ये उत्कृष्ट भातशेती करणारे शेतकरी म्हणून चोरवणेचे प्रकाश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर 1 जुलै कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. याच कृषिदिनाचे औचित्य साधून पंचायत समिती खेड कृषी विभागामार्फत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काळानुरूप बदल करून आधुनिक पद्धतीने शेती करावी व शेतीमध्ये कमीत कमी नुकसान होईल योग्य पद्धतीने शेतीमध्ये नवनवीन उपक्रम राबवून पुढील पिढीला शेतीमध्ये अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचे मार्गदर्शन कृषी विभागामार्फत नेहमीच करण्यात येत आहे. शिंदे यांनी शासनाच्या सहकार्याने शेतीमध्ये नवनवीन उपक्रम राबवून अनेक फळझाडे लावली आहेत. आंबा, सागाची झाडे लावली आहेत. याचप्रमाणे पूर्वीपासून कसत असलेली भातशेती नवनवीन प्रयोग वापरून पहिल्यापेक्षा जोमाने करत आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शिंदे यांचे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. तरीही निसर्गनिर्मित आलेल्या संकटाला न डगमगता त्यांनी नव्या जोमाने याच शेतीमध्ये भातशेती केली आणि सन 2021-22 वर्षातील कृषी विभागामार्फत झालेल्या सर्वेक्षणात तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावला.
---------

लांजा दिवाणी न्यायालयात
जनजागृती कार्यक्रम
लांजा ः तालुका विधी सेवा समिती लांजा यांच्यावतीने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम दिवाणी न्यायालयात झाला. या वेळी दिवाणी न्यायाधीश तथा लांजा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष पी. आर. भोसले, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, लांजा तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. विलास कुवळेकर, लांजा तालुका विधी सेवा समितीचे पॅनेल विधीज्ञ ॲड. समीर दळवी उपस्थित होते. ॲड. कुवळेकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबतची माहिती दिली. लांजा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष पी. आर. भोसले यांनी मध्यस्थी प्रक्रियेची गरज व त्यापासून होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी ॲड. स्मिता मांडवकर, ॲड. प्रशांत गुरव, ॲड. पूजा पाटील आदी उपस्थित होते.
---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.