रत्नागिरी-काँग्रेसचा सफाई आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी-काँग्रेसचा सफाई आंदोलनाचा इशारा

Published on

फोटो ओळी
-rat४p३८.jpg- rat४p३८ रत्नागिरी ः विविध मागण्यांसाठी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदार चंद्रकांत म्हात्रे यांना निवेदन दिले.


काँग्रेसचा सफाई आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी, ता. ४ ः वाढीव वीजबिल रद्द करावे तसेच जात पडताळणी, उत्पन्नाचे दाखले, राष्ट्रीयत्वाचा दाखला, नॉन क्रिमिलेअरचा दाखला आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील अस्वच्छता, दुर्गंधी नष्ट करावी अन्यथा काँग्रेस सामाजिक न्यायच्या वतीने सफाई आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन काँग्रेसतर्फे तहसीलदार यांना देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आणि शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यत आले. वाढीव वीजबिलामळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे ते रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली तसेच शाळा, कॉलेजच्या प्रवेशप्रक्रिया सुरू आहेत. विद्यार्थ्यांना व अन्य लोकांना लवकरात लवकर उत्पन्नाचे दाखले, राष्ट्रीयत्वाचा दाखला, नॉन क्रिमिलेअरचे दाखले मिळावेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी आहे. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना तसेच नातेवाइकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही दुर्गंधी लवकरात लवकर नष्ट करावी अन्यथा काँग्रेस सामाजिक न्यायच्यावतीने सफाई आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी सामाजिक न्याय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ किल्लेदार, शेतकरी कष्टकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम गायकवाड, हारिश शेकासन, रत्नागिरी शहराध्यक्ष रमेश शहा, शरद कापसे, विश्वभंर भाटकर, सुभाष डोर्लेकर, प्रकाश साळवी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.