चिपळूण ः सकस हिरव्या चाऱ्याने दुग्ध उत्पादन वाढ

चिपळूण ः सकस हिरव्या चाऱ्याने दुग्ध उत्पादन वाढ

Published on

३M१४३४६
फोटो - RATCHL६३.JPG - चिपळूण ः बहुवार्षिक चाऱ्याची लागवड करताना आमदार जाधव व पशुसंवर्धनचे अधिकारी.

सकस हिरव्या चाऱ्याने दुग्ध उत्पादन वाढ

डॉ. धनजंय जगदाळे ;बहुवार्षिक चारा पिकांची लागवड
चिपळूण, ता. ६ ः दुग्ध व्यवसायात आर्थिक उत्क्रांतीची ताकद आहे. दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून अनेकजण त्याकडे कानाडोळा करतात; मात्र गायी-म्हैशींना आपल्याच शेतातील सकस हिरव्या चाऱ्याचा आहार दिल्यास दुग्ध उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शेतात सकस आहाराची लागवड केल्यास उप्तादन खर्चदेखील कमी होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी पशू आहारावरील खर्च कमी करून नफ्याचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धनजंय जगदाळे यांनी कळबंस्ते येथील कार्यक्रमात केले.
शहरालगतच्या कळबंस्ते येथे पशुसंवर्धन विभागाची मोठ्या प्रमाणात जागा आहे. या कार्यालयाच्या मोकळ्या जागेत आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला कळबंस्तेचे सरपंच विकास गमरे, माजी सभापती शौकतभाई मुकादम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धनंजय जगदाळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुधीर कानसे यांच्यासह बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या. या वेळी डॉ. जगदाळे यांनी बियाणे लागवडीबाबत मार्गदर्शन केले. येथील गायी-म्हैशींना सकस ओला आहार मिळत नाही. केवळ सुक्या चाऱ्यावर दुग्ध उत्पादन जास्त होत नाही. चाऱ्यावरच शेतकऱ्यांचा ७० ते ८० टक्के खर्च होतो. यासाठी आपल्याच शेतात शेतकऱ्यांनी सकस आहाराची लागवड करण्याची आवश्यकता आहे. यामुळे पशूआहारांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढले, असे त्यांनी सांगितले.
येथील अनेक शेतकऱ्यांना या चाऱ्याची पुरेशी माहिती नाही. त्याची माहिती व्हावी त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी याकरिता कळबंस्ते येथील पशुसंवर्धन कार्यालयात परिसरात बहुवार्षिक चारापिकाची लागवड करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुपर नेपियर, सुबाभूळ, दशरथ, अंजन, हदगा, शेवगा, तुती, ठोंबे, काड्या, बी वाटप करण्यात आले. पशुआहारावरील खर्च कमी करणे, औषधोपचारावरील खर्च कमी करणे, पशूजन्य उत्पादनांचे मूल्यवर्धन करून ग्राहकांना थेट विक्री करून नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आमदार जाधव यांनीही शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.