परदेशातील नोकरीपेक्षा व्यवसाय करा

परदेशातील नोकरीपेक्षा व्यवसाय करा

Published on

swt६२९.jpg
१४३६२
साळगावः जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगाव महाविद्यालयात विद्यार्थाना मार्गदर्शन करताना मान्यवर.

परदेशातील नोकरीपेक्षा व्यवसाय करा
पंढरी परबः साळगाव महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ः सिंधुदुर्गालाच न्हवे तर संपूर्ण देशभरात टुरिझमला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, त्याची गुणवत्ता राखण्यासाठी कौशल्यपूर्ण आणि प्रमाणित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याचा फायदा आजच्या तरुण पिढीने घ्यावा. यासाठी हॉटेल मॅनेजमेंटसारख्या कोर्स पूर्ण करून परदेशात नोकरी मिळवण्यापेक्षा स्थानिक पातळीवर स्वतःचे व्यवसाय सुरू करा. त्याचा व्यवसायासाठी नक्कीच फायदा होईल, असा सल्ला व आवाहन लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक पंढरी परब केले. ते जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगाव महाविद्यालयाचा प्रथम वर्ष बीएससीएचएस (हॉटेल मॅनेजमेंट) च्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात बोलत होते.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी फ्रेशर्स डे चे आयोजन केले होते. शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी लोकमान्य एज्युकेशनचे प्रवीण प्रभूकेळुसकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, "आयुष्याच्या निर्णयाक क्षणी हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र निवडून आजच आपण आपलं भविष्य उज्वल केले आहे. देशातच नव्हे तर विदेशात देखील आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले व महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवत आहेत आणि भविष्यात असे अनेक विद्यार्थी घडविण्याचा संकल्प आमचा आहे. समोरून चालत आलेल्या संधीचा फायदा घ्या, मेहनत करा. आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास हा आम्ही सार्थ ठरवू." हॉटेल मॅनेजमेंटचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर १०० टक्के नोकरीबाबत आश्वस्त करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जयहिंद कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य अमेय महाजन, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य सच्चिदानंद कनयाळकर यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन पालकांनी मुलांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.