सिंधुदुर्ग महाविद्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळा

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळा
Published on

swt630.jpg
M14363
मालवणः सिंधुदुर्ग महाविद्यालयात पुस्तकांचे प्रकाशन प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

सिंधुदुर्ग महाविद्यालयात
पुस्तक प्रकाशन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शाहू जयंतीचे औचित्य साधून प्रा. कैलास राबते यांनी लिहिलेल्या ‘झोंबंड एक वाड्मयीन मूल्यमापन’ व ‘महादेव मोरे जीवन व कार्य’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन तसेच प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी लिहिलेल्या फंडामेंटल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट व अर्थशास्त्राचे प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी लिहिलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या डोंगरी भागातील सार्वजनिक वितरण व्यवस्था या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयातील मराठी विभाग व एन. एस. एस. विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर प्रा. राबते, प्रा. डॉ. खोत यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकून पुस्तक लिहिण्यामागील आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. प्रा. डॉ. ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. कैलास राबते, डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. सी. बर्वे आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा. चौगुले यांनी केले. प्रा. शंकर खोबरे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.