चिपळूण ः कालुस्ते येथे वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प

चिपळूण ः कालुस्ते येथे वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प

Published on

फोटो - ratchl६४.jpg ः१४३५४
चिपळूण ः करंबवणे रस्त्यावर कोसळलेला वृक्ष ग्रामस्थांनी बाजूला केला.

कालुस्ते येथे वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प

चिपळूण, ता. ६ ः तालुक्यातील कोंढे-करंबवणे मार्गावर कालुस्ते घाटात गुरूवारी (ता. ६) सकाळी वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प्प झाली होती; मात्र वाहनालक आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवत वृक्ष तोडून वाहतूक सुरळीत केली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
तालुक्यातील कोंढे ते भिले करंबवणे मार्गावरील कालुस्ते घाटात गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोठा वृक्ष कोसळून दरडीसह रस्त्यावर आला. याबाबत कालुस्ते सरपंच रामकृष्ण कदम यांनी स्थानिक प्रशासनाला माहीती दिली; मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनालक यांनी पुढे येऊन झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. गुरूवारी सकाळपासून दमदार पाऊस सुरू आहे. दिवसभरात दुपारी थोड्यावेळासाठी उघडीप घेतली. पुढे पून्हा संततधार सुरूच झाली. या पावसामुळे गुहागर बायपास मार्गावर झाड कोसळले. अर्ध्या रस्त्यावर हे झाड पडल्याने काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.