राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक यांची नियुक्ती

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक यांची नियुक्ती

kan68.jpg
M14382
मुंबईः अबिद नाईक यांना जिल्हाध्यक्ष नियुक्तीचे पत्र देताना सुनिल तटकरे.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी
अबिद नाईक यांची नियुक्ती
कणकवली, ता. ६ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर आता पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी कणकवलीचे अबिद नाईक यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज त्यांना हे नियुक्तीपत्र दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अबिद नाईक यांचा गट हा अजित पवार यांच्यासोबत गेला आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यात अनेक दावेदार होते. मात्र, कणकवलीचे माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी बाजी मारत जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. श्री. नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते आहेत. पक्ष वाढीसाठी त्यांनी आतापर्यंत मेहनत घेतली आहे. हे लक्षात घेऊन अबिद नाईक यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागली होती. आता, पुन्हा एकदा अबिद नाईक हे काय चमत्कार करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. जिल्हा अंतर्गत नवीन पदाधिकारी नेमणे हे मोठे आव्हान नाईक यांच्यासमोर राहणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावलाराम अनावक, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावस्कर, सुभाष सावंत, विलास गावकर, इम्रान शेख, अमित केतकर, गणेश चौगुले, निशिकांत कडुलकर, दिलीप वर्णे, केदार खोत, प्रवीण मोर्ये आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com