वालावल-कवठी मार्गावर
कोसळलेले झाड हटविले

वालावल-कवठी मार्गावर कोसळलेले झाड हटविले

Published on

14391


वालावल-कवठी मार्गावर
कोसळलेले झाड हटविले
कुडाळ ः वालावल-कवठी मार्गावर हनुमान मंदिर येथे आज दुपारी भले मोठे झाड कोसळून मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तेथील ग्रामस्थ गोविंद भगत आणि चेंदवण हायस्कूलचे नाईक यांच्या मदतीने रस्त्यावर कोसळलेले झाड मशिनच्या साह्याने तोडून बाजूला करण्यात आले आणि एक तासानंतर कुडाळ-वालावल-कवठी मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली.

14392
देवसूत शाळेच्या शेडवर
फांदी पडल्याने नुकसान
सावंतवाडी ः तालुक्यात काल (ता. ५) रात्री कोसळलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे किरकोळ पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले. यात देवसू येथील जिल्हा परिषद शाळेच्या पत्र्याच्या शेडवर वडाच्या झाडाची फांदी पडून नुकसान झाले. तर सातार्डा येथे साकवावर झाड पडून नुकसान झाले. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. संततधार पावसामुळे नद्यानाल्यांनाही पूरस्थितीत उद्‌भवली. देवसू जिल्हा परिषद शाळेसमोरील पत्र्याच्या शेडवर वडाची फांदी पडून तब्बल पस्तीस हजारांचे नुकसान झाले. ही फांदी बाजूला करत तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात आला. सातार्डा येथेही साकवावर झाड पडल्याने नुकसान झाले. याबाबत येथील महसूल कार्यालयात नोंद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.