मंडणगड - पालेगावी शासन आपल्या दारीमुळे शेतकऱ्यांना लाभ

मंडणगड - पालेगावी शासन आपल्या दारीमुळे शेतकऱ्यांना लाभ

Published on

Rat६p११.jpg ः ३M१४२४६
पाले ः कार्यक्रमात लाभार्थी विद्यार्थिनीस उत्पन्नाचे दाखल्याचे वितरण करताना प्रातांधिकारी डॉ. अजित थोरबोले.

शासन आपल्या दारीमुळे शेतकऱ्यांना लाभ
प्रांताधिकाऱ्यांचा पुढाकार ; उत्पन्न, निराधार दाखल्यांचे वाटप
मंडणगड, ता. ६ ः शासन आपल्या दारी अभियान पाले गावी राबवल्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ घेता आला. पाले व तुळशी गावातील ११ ग्रामस्थांच्या उत्पन्नांच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पाले वरचीआळी समाजमंदिरात शासन आपल्या दारी या मोहिमेअंर्तगत विविध शासकीय योजनांची माहिती व महाराजस्व अभियानांतर्गत शासनाकडून वितरित करण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसील कार्यालय मंडणगड यांच्या देव्हारे महसूल मंडळाच्यावतीने ५ जूनला हा कार्यक्रम झाला. यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ, भूसंपादन विभागाच्या अव्वल कारकून परांजपे, बिच्चेवार, मंडळ अधिकारी नीलेश गोडगासे, प्रकाश साळवी, महेंद्र जाधव, एस. जी. गुरव, तलाठी मयूर पंडित, संजय गावकर, मनोहर पवार, ग्रामपंचायत सदस्य नामदेव दुर्गवले, उज्ज्वला लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम जाधव, पोलिस पाटील रमेश जाधव यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाले व तुळशी गावातील ११ ग्रामस्थांच्या उत्पन्नांच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या दोन पात्र लाभार्थ्यांना पेन्शनचा लाभ देण्यासाठी प्रमाणपत्र वितरित कऱण्यात आले. रास्तदर धान्य दुकानातून धान्य मिळवण्यासाठी मागणी झालेल्या आठ लाभार्थ्यांशी चर्चा करून तसे प्रस्ताव सादर करण्याचे सूचित करण्यात आले. हा कार्यक्रम य़शस्वी करण्यासाठी महसूल विभाग, पाले ग्रामपंचायत व पाले ग्रामस्थ व महिला यांनी मेहनत घेतली.


जमीन अधिग्रहणाबाबत चर्चा
राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यासंदर्भात या परिसरातील नागरिकांच्या अडचणी असल्याने प्रांताधिकारी थोरबोले यांनी या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रक्रिया सुलभिकरणाच्यादृष्टीने आवश्यक सूचना देत या प्रक्रियेतील विविध अडचणी व त्यावरील उपायांवर चर्चा केली. तसेच पूर्ण कागदपत्रे असणाऱ्या शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा करून घेण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.