चिपळूण ः धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत 19 ला बैठक

चिपळूण ः धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत 19 ला बैठक

Published on

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या
प्रश्नाबाबत १९ ला बैठक
चिपळूण ः खेड तालुक्यातील वावेतर्फे खेड येथे गावठाण व जांभूळवाडी या दोन वाड्यांच्या मध्यभागी धरणाचे काम सुरू आहे. या धरणाच्या कामाला सुरवात होऊन ९ वर्ष झाली तरी येथील शेतकरी धरणग्रस्तांना अजूनही न्याय मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी नुकतेच खेडच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार १९ जुलैला खेड प्रांत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थ अरुण उतेकर यांनी दिली.
वावेतर्फे खेड येथे गेल्या ९ वर्षांपूर्वी धरणाच्या कामाला सुरवात झाली; मात्र येथील शेतकरी धरणग्रस्तांना अजूनही न्याय मिळालेला नाही. शासन-प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी खेडच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे यांना निवेदन दिले होते. येत्या १५ दिवसात शेतकरी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात सोडवणूक न झाल्यास धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर येत्या १९ जुलैला खेड येथील प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.