मालवणात पावसाने लाखोंचे नुकसान

मालवणात पावसाने लाखोंचे नुकसान

Published on

swt646.jpg
14434
ओवळीयेः येथील अंकुश गुळेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.

swt647.jpg
14435
असगणी ः ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर कोसळून नुकसान झाले.

swt648.jpg
M14436
दांडी ः मोरेश्वरवाडी येथील स्मशानभूमीवरील पत्र्याची शेड उडून गेल्याने नुकसान झाले.

मालवणात पावसाने
लाखोंचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर आजही कायम होता. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदीनाले तुडुंब भरून वाहत असून काही ठिकाणी पूर स्थितीही निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे तालुक्यात तसेच शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड आणि वित्तहानीच्या घटना घडल्या.
मालवणात पावसाचा जोर कायम आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यात दांडी मोरेश्वरवाडी येथील स्मशानभूमीवरील पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. असगणी ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर कोसळून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले. ओवळीये येथील अंकुश विष्णू गुळेकर यांच्या घरावर झाड पडून भिंत कोसळल्याने सुमारे 33 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.