‘खेलो इंडिया’तील निवडीबाबत
शमिकाचा कुडाळमध्ये सत्कार

‘खेलो इंडिया’तील निवडीबाबत शमिकाचा कुडाळमध्ये सत्कार

Published on

14759
कुडाळ ः ‘खेलो इंडिया’ गोव्यासाठी निवड झाल्याबददल शमिका चिपकर हिचे हायस्कूलतर्फे अभिनंदन करण्यात आले. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘खेलो इंडिया’तील निवडीबाबत
शमिकाचा कुडाळमध्ये सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः कुडाळ हायस्कूलच्या शमिकाची ‘खेलो इंडिया’ गोव्यासाठी निवड झाली आहे. यानिमित्त तिचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. ही निवड प्रोत्साहनात्मक असून पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असल्याचे यावेळी शमिका हिने सांगितले.
‘कमशिप्र’ मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्रशालेची सातवीची विद्यार्थिनी शमिका हिने ‘खेलो इंडिया’ अंतर्गत गोवा येथे जलतरण या क्रीडा प्रकारातून निवड चाचणी दिली. यात तिची ‘खेलो इंडिया’ गोव्यासाठी निवड झाली. ती सोमवारपासून (ता. १०) गोव्यातील शाळेत दाखल होणार आहे. तिचे शिक्षण व निवासाची व्यवस्था सरकारकडून केली जाणार आहे. शमिकाने वयाच्या सहाव्या वर्षापासूनच जलतरणाचे धडे घेतले. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत वयाच्या बाराव्या वर्षी निवती येथे ४० किलोमीटर पोहून विश्वविक्रम केला. जिल्हा व राज्यस्तरावर तिने ३१ पदके प्राप्त केली आहेत. तिच्या यशात आई-वडिलांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. मुख्याध्यापक दिनेश आजगावकर व संस्था पदाधिकाऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी शमिकाच्या आई-वडिलांसह पदाधिकारी भाई तळेकर, अनंत वैद्य, अरविंद शिरसाट, का. आ. सामंत, उपमुख्याध्यापक महेश ठाकूर, राजकिशोर हावळ, पर्यवेक्षक शेषकुमार नाईक आदी उपस्थित होते. क्रीडाशिक्षक विजय मयेकर, वैभव कोंडसकर, सिद्धार्थ बावकर, रामचंद्र खाकर यांचे शमिकाला मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.