तळेरेत विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे धडे

तळेरेत विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे धडे

14769
तळेरे ः ‘प्रज्ञांगण’ येथे पाणी संवर्धन विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. (छायाचित्र : एन. पावसकर)


तळेरेत विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे धडे

‘प्रज्ञांगण’चा उपक्रम; ‘कॅच द रेन ३.०’ अभियानास प्रतिसाद


तळेरे, ता. ८ : नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व प्रज्ञांगण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञांगण येथे जलशक्ती ‘कॅच द रेन ३.०’ या अभियानांतर्गत पाणी संवर्धन विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यानिमित्ताने जलसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात गौरी सारंगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी देशभरात जलशक्ती अभियानाची सुरुवात झाली आहे. हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प असून लोकांपर्यंत जनजागृती व्हावी आणि भूजल पातळी वाढावी तसेच जलप्रदूषण कमी व्हावे या हेतूने ‘कॅच द रेन’ हा उपक्रम राबविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सतीश मदभावे यांनी पाण्याचे महत्त्व सांगताना आज पाण्याचा अपव्यय असा होतो आणि तो कसा टाळता येईल, यावर मार्गदर्शन केले. तर संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी पाण्याचे संवर्धन कशा प्रकारे करता येऊ शकते, यावर मार्गदर्शन केले. उपस्थित सर्वांना ‘जलशक्ती आणि जलसंवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘सीड्स बॉल’ सुद्धा बनविले. या उपक्रमात सुमारे ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमावेळी स्मितेश पाष्टे, राहुल कुंभार, वर्षाराणी कासलीवाल, जयदीप कोनकर आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, प्रज्ञांगणच्या संस्थापिका श्रावणी मदभावे यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला प्रज्ञांगणच्या प्रणाली मांजरेकर, कीर्ती आंबेरकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी पाण्याचे संवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेतली. प्रणाली मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रावणी मदभावे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com