कळवंडेवासीय भितीच्या छायेखाली

कळवंडेवासीय भितीच्या छायेखाली

Published on

कळवंडेवासीय भितीच्या छायेखाली
डीवायएसपींना निवेदन; धरणाच्या कामात सावळागोंधळ, दुर्घटना घडल्यास अधिकाऱ्यांना दोषी धरा
चिपळूण, ता. ८ः तालुक्यातील कळवंडे धरणात सध्या सुरू असलेल्या पिचिंग कामात सावळागोंधळ निर्माण झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीवर लागला आहे. या पार्श्वभूमीवर कळवंडे पंचक्रोशीच्यावतीने कळवंडेतील प्रगतशील शेतकरी वसंत उदेग यांनी शुक्रवारी (ता. ७) उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती कथन केली. कळवंडे ग्रामस्थांना पूर्ण सहकार्य मिळेल, असे डीवायएसपी राजमाने यांनी सांगितले
तालुक्यातील कळवंडे धरणाचे नव्याने केलेले पिचिंगचे काम खचले आहे. भविष्यात या धरणापासून धोका निर्माण होण्याची भीती धरण पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील कळवंडे गावचे प्रगतशील शेतकरी, उद्योजक वसंत उदेग यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची भेट घेतली.
जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे धरण क्षेत्रातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यांच्या जीवनमरणासह उत्पन्नाच्या साधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या धरणातील पाण्यापासून आजपर्यंत येथील शेतकरी शेतीवर आधारित विविध प्रकारची उत्पादने घेऊन उदरनिर्वाह करत होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या हापूस आंबा, मोसमात शेतकरी भाजीपाल्याचे समाधानकारक उत्पादन घेऊ शकले नाहीत. या संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही वस्तुस्थिती अधिकाऱ्यांना सांगितली. धरणक्षेत्रातील ग्रामस्थ जीवितास भविष्यात धोका निर्माण होऊ नये याबाबत अगोदरच उपायोजना व्हावी. भविष्यात काही दुर्घटना घडल्यास संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना दोषी ठरवण्यात यावे, अशी मागणी केली. येथे कोणत्या प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत. ग्रामस्थांना भीतीच्या छायेखाली ठेवू नये याकरिता उपाययोजना करावी म्हणून गरज पडल्यास पोलिस प्रशासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटीस काढेल, असे आश्वासन डीवायएसपी राजमाने यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.