तळगाव रामेश्वर विद्यालयात 
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

तळगाव रामेश्वर विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Published on

14776
तळगाव ः गुणवंत विद्यार्थ्यांसोबत संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी. (छायाचित्र : एन. पावसकर)

तळगाव रामेश्वर विद्यालयात
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

तळेरे, ता. ८ : तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, तळगावमधून दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा विद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंद राजाराम दळवी, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या गणित विषयाच्या प्रा. काजल मातोंडकर उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे सचिव अनिल दळवी, सहसचिव गोविंद दळवी, खजिनदार प्रकाश चव्हाण, सदस्य सूर्यकांत दळवी, शालेय समिती उपाध्यक्ष भानुदास तळगावकर, सदस्य महादेव दळवी, गावचे सरपंच लता खोत, माजी उपसरपंच प्रसाद दळवी, नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, ज्येष्ठ सदस्य विद्याधर देसाई, माजी शालेय समिती सदस्य नामदेव दळवी, मुंबई स्थित दिलीप दळवी, सौ. दळवी, पालक नितीन वेंगुर्लेकर, अनिल तळगावकर, रुची कदम, शाळेचे माजी कर्मचारी नीलकंठ कदम आदी उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्ष उत्तम दळवी यांनी प्रास्ताविक, प्रदीप शिंदे यांनी परिचय केला. प्रमुख पाहुण्या काजल मातोंडकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील संभाव्य शैक्षणिक संधी संबंधी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ‘दैनंदिन नोंद’ वहीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.