युवकांनो, शेती व्यवसायाकडे वळा

युवकांनो, शेती व्यवसायाकडे वळा

14781
मळगाव ः ‘शाळा कॅालेज ते शेतकरी बांध’ उपक्रमाचे उद्‍घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी युवराज लखमराजे भोसले आदी.

युवकांनो, शेती व्यवसायाकडे वळा

राजन तेली; मळगावात ‘शाळा कॉलेज ते शेतकरी बांध’ उपक्रम

सावंतवाडी, ता. ८ ः शेतीपासून दूर जाणाऱ्या युवा वर्गाने शेतीकडे वळणे गरजेचे आहे. युवकांना शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, शेतीतील नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी, शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत व्हावी आणि शाळा-महाविद्यालयांना समाजोपयोगी उपक्रमांत सहभागी होता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा लाभ निश्चितच युवकांना होऊन ते शेती व्यवसायाकडे वळतील, असा विश्वास माजी आमदार तथा भाजपचे आमदार राजन तेली यांनी मळगाव येथे आज केले. सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड-माजगाव व तालुक्यातील महाविद्यालये आणि माध्यमिक विद्यालयांच्या सहकार्याने मळगाव इंग्लिश स्कूल येथे ‘शाळा कॉलेज ते शेतकरी बांध’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्‍घाटन माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सहयोग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, माजगाव सरपंच अर्चना सावंत, माजी सभापती राजू परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, अण्णा देसाई, श्री. बिर्जे, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, मळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. फाले, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, प्रवीण मांजरेकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये सावंतवाडी तालुक्यातील श्री पंचम खेमराज महाविद्यालय, भोसले फार्मसी कॉलेज, भोसले पॉलिटेक्निक, राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज, जे. बी. नाईक कॉलेज, कळसुळकर हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज, श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे, भाईसाहेब माध्यमिक विद्यालय माजगाव, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव, कोलगाव माध्यमिक विद्यालय, व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, माडखोल विद्यालय माडखोल, श्री जनता विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज तळवडे अशा चौदा शाळा, कॉलेज आणि माध्यमिक विद्यालयांमधून सुमारे चारशे ते पाचशे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रात्यक्षिक करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रेन कोट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com