डंपर गटारात कलंडल्याने 
कणकवलीत वाहतूक ठप्प

डंपर गटारात कलंडल्याने कणकवलीत वाहतूक ठप्प

Published on

14803
कणकवली : शहरातील सेवा रस्त्याच्या गटारात डंपर कलंडल्‍याने वाहतूक खोळंबली होती.

डंपर गटारात कलंडल्याने
कणकवलीत वाहतूक ठप्प

कणकवली, ता. ८ : शहरातील गांगोमंदिरलगतच्या गटारात डंपर कलंडल्‍याने येथील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या साहाय्याने डंपर बाजूला केला. त्‍यानंतर सेवा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.
शहरातील गडनदी ते जानवली नदी पूल या दरम्‍यान फूटपाथ बांधलेले आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी हे पदपथ असले तरी त्‍यावर अवजड वाहने उभी केली जातात. आज शहरातील गांगो मंदिरलगत खडी घेऊन जाणारा डंपर येथे उभा केला होता. यात पदपथावरील क्राँक्रिट तुटून डंपर कलंडला आणि सेवारस्ता दुचाकी वगळता इतर वाहनांसाठी बंद झाला. त्‍यामुळे गांगोमंदिर ते शहरातील पटवर्धन चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्‍या होत्या. ही बाब लक्षात येताच वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्‍यानंतर स्थानिकांच्या मदतीने हा डंपर बाजूला करण्यात आला. त्‍यानंतर गोवा ते मुंबई या दिशेने जाणारा सेवारस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. शहरात ठिकठिकाणी नव्याने बांधकामे केली जात आहेत. या बांधकामावेळीही पदपथावरून अवजड वाहने हाकली जातात. यामुळे पदपथ ठिकठिकाणी तुटलेल्‍या स्थितीत असून, त्‍याचा मोठा त्रास पादचाऱ्यांना होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.