स्वरुपानंद विद्यामंदिरमध्ये गुणवंतांचा गौरव

स्वरुपानंद विद्यामंदिरमध्ये गुणवंतांचा गौरव

rat8p3.jpg ः
3M14741
पावसः स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरामध्ये गुणवंतांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक.
----------

स्वरुपानंद विद्यामंदिरमध्ये गुणवंतांचा गौरव
पावसः रत्नागिरी तालुक्यातील पावसच्या स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस आणि डॉ. बी. आर. तथा दादासाहेब सामंत ज्युनिअर कॉलेजच्या भव्य सभागृहात गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. पहिले संचालक (कै.) तात्यासाहेब सामंत यांचा स्मृतिदिन तथा विद्यार्थी गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. प्रथम (कै.) तात्यासाहेब सामंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. मान्यवरांनी (कै.) तात्यासाहेब सामंत यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर या कार्यक्रमांमध्ये बोर्ड परीक्षा दहावी व बारावी आर्टस्, कॉमर्स सायन्स या परीक्षेमध्ये वर्गामध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या व विषयांमध्ये प्रथम आलेल्या तसेच एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या 27 विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आठवीच्या विद्यार्थ्यांनी लाखो रुपयाची शिष्यवृत्ती पटकावली व रत्नागिरी जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान पटकावला व रिया हरमले ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आली. कार्यक्रमासाठी ग्रामसुधारक सेवा समिती मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाथरे, उपाध्यक्ष रवींद्र साळुंके, सहसचिव सुरेश गुरव, डॉ. राजेश सामंत, लोकल कमिटी अध्यक्ष प्रा. माधव पालकर व सर्व सदस्य उपस्थित होते.
----------
rat8p5.jpg
M14743
गावतळेः दमामे शाळेत वृक्षारोपण करताना मान्यवर.
------------
दमामे शाळेत ७० विद्यार्थ्यांना शालेय कीटचे वाटप
गावतळेः गूंज फाउंडेशनतर्फे दमामे मराठी शाळेत ७० विद्यार्थ्यांना शालेय कीटचे वाटप करण्यात आले. या वेळी उपसरपंच गंगाराम हरावडे,
कृषी सहाय्यक चंदा गावंडे, सरपंच अर्पिता शिगवण, जानू जाधव, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष देवघरकर उपस्थित होते. गूंजचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विजय दुर्गावले यांनी फाउंडेशन गावोगावी विश्वासाने काम करत असून, दमामे गावासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगितले. लवकरच शाळेला स्मार्टटीव्ही देण्याचे अभिवचन दुर्गावले यांनी दिले. यानंतर विठ्ठल रूक्मिणी तसेच वारकरी असे वेष परिधान करून सर्व विद्यार्थी, ग्रामस्थांनी गावातून वृक्षदिंडी काढत टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्षारोपण केले. विठूरायांच्या अभंगात आणि वरुणराजाच्या वर्षावात सर्व न्हाऊन गेले. या वेळी सुमारे ७० ग्रामस्थ, तेवढेच विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांच्यासह विजय दुर्गावले उपस्थित होते.
------
rat8p6.jpg
M14744
सावर्डेः स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले श्री सदस्य.
---------------

सावर्डेत स्वच्छता मोहीम
सावर्डेः चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केदारनाथ मंदिर, श्री वैजनाथ मंदिर ते डेरवण फाटा ते डेरवण रुग्णालय रस्त्यापर्यंत स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूचा रोड साफ करून सुका कचरा ७०० किलो जमा केला. यासाठी ६२ श्री सदस्य हजर होते. सकाळी सात-नऊ वाजेपर्यंत परिसर साफ करण्यात आला.
---------
rat8p8.Jpg
M14756
असोंडः रस्त्यावरील झाड बाजूला करण्यासाठी भरपावसात सहकार्य करताना उपसरपंच दीपक देवरूखकर, तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम रसाळ, पोलिस पाटील कमलाकर आग्रे.
-------------
असोंडमध्ये वादळी पावसाने नुकसान
गावतळेः दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत असोंड शिवनारी परिसरात वादळ व पावसामुळे वाकवली उन्हवरे रस्त्यावर पहाटे अनेक झाडे पडली होती. उपसरपंच दीपक देवरूखकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजाराम रसाळ, पोलिस पाटील कमलाकर आंग्रे यांच्या सहकार्याने पावसाने कोलमडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेले झाड बाजूला करून साफसफाई करण्यात आली. झाडे पडल्याचे समजताच त्यांनी प्रथम नायब तहसीलदार तसेच बीट अंमलदर पवार यांना त्वरित कळवून जेसीबीची मागणी केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंते केवारी यांनी भेट देऊन कामासंदर्भात मार्गदर्शन केले.
--------
Rat8p9.jpg
M14757
अडखळः कृषिदिन कार्यक्रमात वृक्षारोपण करताना गटविकास अधिकारी विशाल जाधव.
------------
अडखळला वृक्षलागवड कार्यक्रम
मंडणगडः कृषिदिनाचे औचित्य साधून पंचायत समिती मंडणगड व ग्रुप ग्रामपंचायत अडखळ यांच्यावतीने अडखळ येथे कृषिदिन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया घोडके, विस्तार अधिकारी पवन गोसावी, ग्रामसवेक दिनेश शिगवण, कृषी सहाय्यक प्रदीप मराठे, पाटील, माळी, सरपंच करिना रक्ते, उपसरपंच सुरज पाडावे व ग्रामस्थ उपस्थित होते. अडखळ ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्य शासनाकडून ५० लाखांचे पारितोषिक प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांचा गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत असल्याने शेतकऱ्यांना भरड धान्यांचे महत्व सांगून लागवडीची माहिती देण्यात आली. कृषी विभागाकडून खरिप हंगामाकरिता तृणधान्यांचे वाटपही करण्यात आले. ग्रामपंचायतीच्यावतीने प्रतिकुटंब एक झाड या प्रमाणे गावातील सर्व कुटुंबांना झाडांचे वाटप करण्यात आले.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com