चिपळूण शहराचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

चिपळूण शहराचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत
Published on

चिपळूणचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत
शिवनदी परिसरातील दुरुस्तीचे काम मार्गी
चिपळूण, ता. ८ः शहरातील शिवनदी परिसरातील १५ इंचीच्या फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे अर्ध्या शहराचा २ दिवस बंद राहिलेला पाणीपुरवठा मंगळवारी रात्रीपासून सुरळीत झाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांशी पाइपलाइन रस्त्याखालून गेल्या आहेत. त्या अनेक वर्षांच्या असल्याने त्यांना गळती लागण्यासह त्या फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. चार दिवसांपूर्वी अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन शिवनदी परिसरात फुटली होती. पाणीपुरवठा सुरू असताना हा प्रकार घडल्याने पाण्याच्या दाबाने पाईपही जागोजागी निसटून वेगळे झाले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चिपळूण येथे जेसीबी आणून मोठी खोदाई करत फुटलेल्या पाईपचा शोध घेऊन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पाणी विभागाचे अभियंता नागेश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ कर्मचाऱ्यांनी हे काम मंगळवारी सायंकाळी पूर्ण केले. त्यानंतर काही तास रंगीत तालीम घेऊन त्यानंतर रात्री उशिरा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. बुधवारपासून भोगाळे, चिंचनाका, भैरी मंदिर परिसर, कदम चाळ, मार्कंडी, प्रभातरोड आदी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.