खेडमध्ये पावसाची विश्रांती

खेडमध्ये पावसाची विश्रांती

rat8p31.jpg, rat8p32.jpg ः
M14834
साडवली ः देवरूख शहरात मनसेतर्फे एक सही संतापाची उपक्रम राबवण्यात आला.
------------
देवरूखात मनसेतर्फे
एक सही संतापाची उपक्रम
साडवलीः महाराष्ट्राच्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी दलबदलू नेत्यांनी जे राजकारण केले त्यामुळे मतदार संतापून उठले, ही बाब हेरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्वत्र एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात आली. देवरूख शहरात मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, मनसे शहराध्यक्ष सागर संसारे यांच्या नेतृत्वाखाली एक स्वाक्षरी संतापाची ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी देवरूख शहरातील मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या वेळी शहरातील नागरिकांना सही करण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्याबद्दल राग व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसेच्यावतीने एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात आली नागरिकांनी या फलकावर सही करून संताप व्यक्त केला. यामध्ये युवा मतदारांचे प्रमाण अधिक होते.

..........
खेडमध्ये पावसाची विश्रांती
खेडः मुसळधार पावसाने जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत राहिल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती; मात्र शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पूरसदृश स्थिती निवळली आहे. शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे तालुक्यातील चोरद जगबुडी व नारिंगी नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. दुपारच्या सुमारास जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडून वाहत राहिल्याने नदीपात्रामधील पाणी मटणमच्छी मार्केटमार्गे शहरात शिरण्याचा धोका निर्माण झाला होता तर येथील बंदररोड पूर्ण पाण्याखाली गेला होता. खेड-दापोली मार्गावरील नारिंगी नदीचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे येथील प्रशासन सतर्क होऊन नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com